Eknath Shinde vs Devendra Fadnavis | आम्ही कोणाचे श्रेय नाकारत नाही- एकनाथ शिंदे | Sakal Media
शिवसेनेने कधीही श्रेयवाद केला नाही. जे लोकांच्या हिताचं आहे, ज्या प्रकल्पातून लोकांना फायदा होणार आहे तेच काम शिवसेनेनं केलं आहे. समृद्धी महामार्ग हा गेम चेंजर प्रकल्प असून आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता आहे. तसेच या रस्त्याचे नागपूर ते शेलू पर्यंत २१० किलोमीटरचा रस्त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी येत्या १ मे ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करून वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचे राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या महामार्गाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेृत्वाखाली सुरू झाला ही वस्तुस्थिती आहे. परंतु मात्र त्यावेळी देखील मी एमएसआरडीसी खात्याचा मंत्री होतो आणि त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला. तसेच कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या महामार्गाचे काम सुरळीत पणे सुरू राहिले. त्यामुळे आम्ही कोणाचे श्रेय नाकारत नसल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. लोकभिमुक प्रकल्पांना शिवसेनेनं कधी विरोध केला नाही. विरोध केला असता तर हा रस्ता झाला नसता. सुरुवातीला या रस्त्याला लोकांचा विरोध होता तो मी मंत्री म्हणून स्वतः पुढाकार घेऊन दूर केला. मोठ्या प्रमाणात जमीन हाती घेऊन काम केले आहे. नागपूर ते शेलू पर्यंत काम पूर्ण झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच योगदान कोणाला सांगायची गरज नाही. बाळासाहेबांचं नाव देऊन समृद्धी महामार्गाची उंची वाढणार आहे. १ मे ला महाराष्ट्र दिनी समृद्धी महामार्गाच लोकार्पण करणार असल्याचं यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.